Frequently Asked Questions
लर्निफाय अकॅडमी हे प्रज्ञाशोध परीक्षेसारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पोर्टल आहे. पोर्टल विविध शैक्षणिक साधने पुरवते, ज्यामध्ये विषयनिहाय धड्यांचे व्हिडिओ, संवादात्मक प्रश्नमंजुषा, आणि दैनिक सराव प्रश्नमंजुषा इत्यादींचा समावेश आहे. विद्यार्थी हे साहित्य कधीही आणि कुठेही आपल्या वेळेनुसार पाहू शकतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या गतीने अभ्यास करण्याची आणि वेगवेगळ्या विषयांची ताणरहित तयारी करण्याची संधी मिळते.
लर्निफाय अकॅडमीवर विद्यार्थी म्हणून नोंदणी कशी करावी?
Google Chrome, Internet Explorer किंवा तुम्ही मोबाईल वर वापरत असलेल्या कुठल्याहि Browser वर www.learnify-academy.com search करा.
१) नोंदणी पृष्ठाला भेट द्या: होम पेज वर उजव्या बाजूला मेनू आयकॉन वर क्लिक करा. My Account वर क्लिक करा. त्यावर Register ला क्लिक करा.
२) तपशील भरा: फॉर्म मध्ये तुमचे नाव, ईमेल, मोबाईल नंबर, शाळेचे नाव इत्यादी माहिती भरा आणि पासवर्ड तयार करा. (युजरनेम आणि पासवर्ड साठी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर वापरू शकता. जेणेकरून लक्षात राहणे सोपे होईल.)
३) सबमिट करा: तपशील भरल्यानंतर, “सबमिट” बटणावर क्लिक करा. तुम्हाला समोर आता तुमचे प्रोफाइल पेज दिसेल.
४) पुन्हा लॉगिन करा: एकदा तुमचे रेजिस्ट्रेशन झाल्यानंतर,तुमच्या प्रोफाइल पेजवरच्या लॉगऑऊट बटनावर क्लिक करून अकाउंट लॉगऑऊट करा. (सरावासाठी हे करणे गरजेचे आहे) समोर आता लॉगिन फॉर्म दिसेल.
५ ) रेजिस्ट्रेशन फॉर्म भरते वेळी जे युजरनेम आणि पासवर्ड तुम्ही वापरले असेल ते लिहून पुन्हा एकदा लॉगिन करून पहा.
वर सांगितल्याप्रमाणे लक्षात आले नसेल तर आम्ही खाली दिलेला हेल्प विडिओ पहा म्हणजे विद्यार्थी म्हणून रेजिस्ट्रेशन करणे सोप्पे वाटेल.
पोर्टलवर विषयनिहाय धड्यांचे व्हिडिओ आणि प्रश्नमंजुषा कुठे आणि कसे शोधायचे?
विषयनिहाय धडे व्हिडिओ आणि प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी:
तुमच्या अकाउंट ला लॉगिन करा.
www.learnify-academy.com/dashboard
मेनू आयकॉन ला क्लिक करून सब्जेक्टस मेनू ला क्लिक करा. पेजवर तुम्हाला परीक्षेसाठी असणाऱ्या सगळ्या विषयांची (उदा., गणित, भाषा, बुद्धिमत्ता इ.) लिस्ट पहायला मिळेल. त्यातून तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयावर क्लिक करून त्यात असणारे धडे तुम्हाला दिसतील. जो धडा तुम्हाला पहायचा आहे त्याच्या खाली GO TO LESSON बटण ला क्लिक केल्यावर तुम्हाला तो धडा पाहता येईल.
अगदी असेच quiz साठी GO TO QUIZ बटण ला क्लिक केल्यावर तुम्हाला quiz देखील सोडवता येईल.
दैनिक प्रश्नमंजुषा (Daily Quizzes) काय आहे?
दैनिक प्रश्नमंजुषा पेज हे विद्यार्थ्यांना दररोजच्या अभ्यासाच्या सरावासाठी समर्पित केलेले आहे. ह्या पेजवर दररोज नवीन प्रश्नांची एक मालिका ( Quiz ) पोस्ट केली जाते, ज्यामध्ये विविध विषयांचा समावेश असतो. यामुळे विद्यार्थ्यांचा दररोज सराव होतो. ज्याने विषयांचा अभ्यास आणि त्यावरच्या प्रश्नांची तयारी ह्या दोन्ही गोष्टी साध्य होतात.
https://learnify-academy.com/daily-quiz/