विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव तत्पर

विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि आत्मविश्वास यामध्ये सक्षम करणे हे आमचे ध्येय आहे. आमच्या अनुभवी शिक्षकांच्या टीमने इथे येणारा प्रत्येक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा आणि भविष्यातील आव्हानांसाठी उत्कृष्टपणे कसा सामोरा जाऊ शकेल हे सुनिश्चित करून सर्व आवश्यक विषयांचा एक सर्वसमावेशक अभ्यासक्रम काळजीपूर्वक तयार केला आहे.

प्रश्नपत्रिका-संच

लर्निफायची सिरीज खास
स्पर्धा परीक्षेत यश हमखास! ”

प्लॅटफॉर्मवरचे अपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्यासोबत कनेक्ट व्हा.

विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी तज्ञ मार्गदर्शन शिबीर ऑनलाईन

स्पर्धा परीक्षांचे महत्व, तयारीचे तंत्र आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये तसेच विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि योग्य दिशा मिळवण्यासाठी मार्गदर्शक एकदिवशीय मार्गदर्शन शिबीर.

प्रत्येक रविवारी सायंकाळी ७.०० ते ८.००

दैनंदिन प्रश्नमंजुषा (Daily Quiz)

सातत्यपूर्ण सराव हा स्पर्धा परीक्षा यशाचा आधारस्तंभ आहे आणि तेच आम्ही आकर्षक आणि प्रभावी बनवतो. आमच्या प्लॅटफॉर्मवर दैनंदिन प्रश्नमंजुषा ( Daily Quiz ) आहेत ज्या अनुभवी शिक्षकांनी तयार केलेल्या लेसन्स वर आधारित असतात. प्रत्येक प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांना विषयाच्या प्रत्येक स्तरावर आव्हान देण्यासाठी डिझाइन केलेली आहे, ज्याने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि विषयाबद्दलची समज वाढविण्यात मदत होईल.

प्रशमंजुषेनंतर येणाऱ्या त्वरित अभिप्राय आणि तपशीलवार स्पष्टीकरणांसह, विद्यार्थी त्यांच्या चुकांमधून शिकू शकतात आणि सुधारणा करू शकतात. आमच्या प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांना एक मजेशीर अनुभव देतात आणि अभ्यासात होत असलेली प्रगती दर्शवतात.

student-dashboard-pic
Learnify Academy

लर्निफाय अकॅडमीला का निवडायचे?

लर्निफाय अकॅडमी निवडणे म्हणजे यशाचा मार्ग निवडणे. आमचे पोर्टल हे केवळ शिकण्याचा प्लॅटफॉर्म नाही – हा शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी समर्पित समुदाय आहे. आम्ही का वेगळे आहोत तर >>

तज्ञ शिक्षक

स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासक्रम तयार करण्याचा अनेक वर्षांचा अनुभव असलेले शिक्षक

lessons

सर्वसमावेशक अभ्यासक्रम

प्रज्ञाशोध सारख्या सर्व स्पर्धा परीक्षा लक्ष्य असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे.  

quizzes

वैयक्तिकृत शिक्षण

प्रश्नमंजुषा आणि त्यांचे रिझल्ट्स यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या रेकॉर्डस् वर लक्ष देता येते.

सदैव तत्पर

यशस्वी होण्यासाठी आम्ही विद्यार्थी आणि पालक दोघांनाही मदतीसाठी तत्पर असतो.

अभिप्राय

पालक, शिक्षक अभिप्राय

Learnify Academy बद्दल आलेल्या पालकांच्या काही प्रतिक्रिया/अभिप्राय

लर्निंफाय अकॅडमी चालवणारे राऊत सर व त्यांचे सहकारी सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद…..🙏. ही अकॅडमी मोफत चालवली जाते. यामध्ये येणारे व्हिडिओज तसेच त्यावरील test याची खूप छान पद्धतीने मांडणी केली आहे मुलांना त्याचा खूप फायदा होतो. माझ्या वर्गातील 28 पैकी 20 मुले ही टेस्ट नेहमी सोडवतात.त्यापैकी 7 ते 8 मुले 50 पैकी 50 मुले मार्क्स मिळवतात. पालकही याचा मनापासून मुलांकडून सराव करून घेतात. कोणतीही फी न आकारता अगदी मोफत मुलांना याचा सराव होतो… त्यामुळे मनापासून यासाठी झटणाऱ्या सर्वांना खूप खूप धन्यवाद 🙏. आपली ही निरपेक्ष सेवा नक्कीच सर्वाना फायद्याची होईल… तुमच्या या उपक्रमास मनापासून खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सौ. सुजाता राजकुमार गडकरी.

उपशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसे

माझा मुलगा वेदांत लेंभे आपल्या learnify daily quiz sodavto याचा त्याला येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी फायदाच होणार आहे.सर्वच मुलांच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तुमचे हे कार्य खूप महत्त्वाचे आहे सर.तुमचा हा उपक्रम विद्यार्थ्याच्या बुध्दीला चालना देणारा आहे.तुमच्या हातून यशस्वी विद्यार्थी घडवण्याचे कार्य होत आहे .असेच मार्गदर्शन सर्वांना मिळत राहो हीच इच्छा! तुम्हाला आणि सर्व विद्यार्थ्यांना आम्हा पालक वर्गाकडून खूप खूप शुभेच्छा! तुमच्या learnify टीमचे खूप खूप आभार.
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻💐💐👍🏻👍🏻

user-icon-placeholder

शीतल लेंभे

(पालक)

सर खरच खूप धन्यवाद 💐💐💐💐
सेशन खूप सुंदर होते.मी माझ्या मुलासोबत स्वतः ऐकले. अत्यंत सुंदर आणि उपयुक्त माहिती सरांनी दिली. तुमच्या संपूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद. कारण मुलांसाठी जे सुंदर सुंदर व्हिडिओ आणि त्यावरचे क्विज जे तुम्ही अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार करून मुलांसमोर मांडता ते मुलांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
खऱ्या अर्थाने तुमचा Learnify टीमचा जो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीचा तळमळीचा प्रयत्न आहे त्याचे करावे तितके कौतुक कमी आहे.
सराव संच लवकरात लवकर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा ही अपेक्षा.
पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

user-icon-placeholder

जया कदम

(पालक)

विद्यार्थी आणि पालकांसाठी सहयोगी शैक्षणिक वातावरण

आमचा विश्वास आहे की शिक्षण हे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यातील समतोल भागीदारी आहे. आम्ही या पोर्टलद्वारे हि भागीदारी आणखी सोपी करून देत आहोत जेथे विद्यार्थी त्यांच्या स्वत:च्या गतीने प्रगती करू शकतात, तर पालक त्यांच्या मुलाच्या शैक्षणिक प्रवासात त्यांना मदत करू शकतात. लर्निफाय अकॅडमी विद्यार्थ्यांना तपशीलवार कार्यप्रदर्शन अहवाल प्रदान करते, ज्यात विध्यार्थ्यांचे सामर्थ्य आणि गरजेच्या सुधारणा या दोन्ही गोष्टी अधोरेखित होतात. ज्याद्वारे शिक्षक विदयार्थी आणि पालक यांमध्ये पारदर्शकता येते. आम्ही पालकांना स्पर्धा परीक्षा प्रक्रियेत दिशा दर्शक म्हणून मदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

+
Lessons and Quizzes
+
Locations from all over Maharashtra
+
Students Community and still growing

Learnify Academy
पोर्टलवर नोंदणी कशी करावी ?

आपण शिक्षक असाल तर आपणही नोंदणी करून आपल्या शाळेत हे व्हिडिओ दाखवू शकता.

आजच लर्निफाय अकॅडमीचे सदस्य व्हा आणि उज्ज्वल शैक्षणिक भविष्याकडे पहिले पाऊल टाका!

Email
The form has been submitted successfully!
There has been some error while submitting the form. Please verify all form fields again.

दररोजच्या अपडेटसाठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा

Home Subjects Daily Quiz Account
Scroll to Top